पंचायत समिती,वैभववाडी गतिमान प्रशासन



कोकणातल्या सिंधुदूर्ग जिल्हयाचे प्रवेशव्दार वैभववाडी.
वैभववाडी तालुका हा महाराष्ट्र राज्यातील सिंधुदूर्ग जिल्हयातील प्रवेशव्दार म्हणुन ओळखला जाणारा तालुका आहे. कोकण व पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा तालुका म्हणजे वैभववाडी महाराष्ट्र राष्ट्रीय महामार्ग क्र. 115 ने कोकण व पश्चिम महाराष्ट्र जोडले गेलेले आहे. कोकणातील सौंदर्य , सहयाद्रीचा कणखरपणा यांचा मिलाफ म्हणजे वैभववाडी.
वैभववाडी तालुका हा ग्रामीण तालुका म्हणून ओळख असलेला तसेच पारंपारीक शेती व शेती पुरक व्यवसाय हेच येथील लोकांचे मुख्य उत्पन्नाचे स्त्रोत आहेत. औदयोगिकीकरणाचा या तालुक्याला स्पर्श नसल्याने निसर्गाचे निखळ सौंदर्य आजवर जपलेले आहे. वैभववाडी तालुक्याला धबधब्याचा तालुका अशी वेगळी ओळख असून नापणे, करुळ, शिराळे, आचिर्णे येथील धबधबे प्रसिध्द आहेत. वैभववाडी तालुक्यामध्ये कुर्ली, नाधवडे , आखवणे अशी तीन विशाल धरणेसमाविष्ठ आहेत. ऐनारी येथील प्राचीन गुहा, नाधवडे येथील उमाळा ही ठिकाणे पर्यटन स्थळे म्हणून प्रसिध्द आहेत.

श्री.रामचंद्र धोंडू जंगले
प्रशासक तथा गट विकास अधिकारी (उच्च श्रेणी) वर्ग – १
पंचायत समिती वैभववाडी
पंचायत समिती, वैभववाडी गौरवास्पद कार्य
पंचायत समिती वैभववाडी अंतर्गत सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी कोव्हिड , लम्पी सारखा कठीण काळ असेल किंवा घरे नसलेले गोरगरीब लाभार्थी असतील किंवा दैनंदिन कामकाजातील दिलेले उददीष्ट असेल या सर्वांमध्येच नेहमीच उल्लेखनीय कामकाज केलेले आहे. त्याचीच उपरती पुढील प्रमाणे.

देशातील पहिला कोव्हिड मुक्त तालुका वैभववाडी

प्रधानमंत्री आवास योजना केंद्रस्तर प्रथमव राज्यस्तर व व्दितीय पुरस्कार

रमाई आवास योजना राज्यस्तर प्रथम क्रमांक

लम्पी आजारामध्ये उल्लेखनीय कार्य

बेटी बचाव बेटी पढाओ उल्लेखनीय कार्य

जनसुविधा 100 % कामे पूर्ण

शालेय विदयार्थी 100% पटनोंदणी व 100% उपस्थिती

कृषिविषयक लाभ व मार्गदर्शन यासाठी विशेष प्रयत्न
सार्वजनिक योजना आणि कार्यक्रम यादी
पंचायत समिती वैभववाडी मार्फत नागरिकांना आणि इतर भागधारकांना माहिती आणि सेवा उपलब्ध करून देणे हा पोर्टलमागील उद्देश आहे. कोणताही अभिप्राय खालील पत्त्यावर मेल केला जाऊ शकतो किंवा खालील तपशीलांवर आमच्याशी संपर्क साधा.
पंचायत समिती,वैभववाडी, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र पिन कोड : 416810

श्री.रामचंद्र धोंडू जंगले
गटविकास अधिकारी
9423511835

कनिष्ठ प्रशासन अधिकारी (अस्थापना)
9423321262

श्री मनोज प्रभाकर सवंत
कनिष्ठ प्रशासन अधिकारी (योजना)
9423300261

श्री गणपत रामचंद्र देसाई
सहाय्यक प्रशासन अधिकारी
9423301863
अ.क्र. | सेवेचे नाव | सेवा पुरविण्यासाठी विहित केलेला कालावधी (कामाचे दिवस) | पदनिर्देशित अधिकारी | प्रथम अपिलिय प्राधिकारी | व्दितीय अपिल प्राधिकारी | सेवाउपलब्धतेसाठी अर्ज सादर करण्याचे ठिकाण | सेवा उपलब्धतेसाठी अर्जाचा नमुना | सेवा पुरविणेसाठी अर्जासोबत भरावयाची फी (रुपये) | विहीत कालावधीनंतर सेवा कोणत्या ठिकाणावरुन उपलब्ध होणार |
---|---|---|---|---|---|---|---|---|---|
1 | जन्म नोंद दाखला | 5 दिवस | ग्रामसेवक | सहाय्यक गटविकास अधिकारी | गटविकास अधिकारी | ग्रामपंचायत कार्यालय | उपलब्ध आहे | 20/- | ग्रामपंचायत कार्यालय |
2 | मृत्यु नोंद दाखला | 5 दिवस | ग्रामसेवक | सहाय्यक गटविकास अधिकारी | गटविकास अधिकारी | ग्रामपंचायत कार्यालय | उपलब्ध आहे | 20/- | ग्रामपंचायत कार्यालय |
3 | विवाह नोंद दाखला | 36 दिवस | ग्रामसेवक | संचालक आरोग्य सेवा पुणे | आयुक्त आरोग्य सेवा मुंबई | ग्रामपंचायत कार्यालय | उपलब्ध आहे | 20/- | ग्रामपंचायत कार्यालय |
4 | दारिद्रय रेषेखालील (BPL) असल्याचा दाखला | 7 दिवस | ग्रामसेवक | सहाय्यक गटविकास अधिकारी | गटविकास अधिकारी | ग्रामपंचायत कार्यालय | उपलब्ध आहे | निशुल्क | ग्रामपंचायत कार्यालय |
5 | ग्रामपंचायत येणे बाकी दाखला | 5 दिवस | ग्रामसेवक | सहाय्यक गटविकास अधिकारी | गटविकास अधिकारी | ग्रामपंचायत कार्यालय | उपलब्ध आहे | 20/- | ग्रामपंचायत कार्यालय |
6 | नमुना 8 अ चा उतारा | 5 दिवस | ग्रामसेवक | सहाय्यक गटविकास अधिकारी | गटविकास अधिकारी | ग्रामपंचायत कार्यालय | उपलब्ध आहे | 20/- | ग्रामपंचायत कार्यालय |
7 | निराधार असल्याचा दाखला | 5 दिवस | ग्रामसेवक | सहाय्यक गटविकास अधिकारी | गटविकास अधिकारी | ग्रामपंचायत कार्यालय | उपलब्ध आहे | निशुल्क | ग्रामपंचायत कार्यालय |
श्रीम.शिवाली प्रविण नरेवाडीकर
ग्रामीण पाणी पुरवठा जि.प.उपविभाग,वैभववाडी जि.सिंधुदुर्ग
- [email protected]
- 9881981103
श्रीम.अनुराधा गणेश बिराजदार
तालुका वैदयकीय अधिकारी कार्यालय वैभववाडी जि.सिंधुदुर्ग
- [email protected]
- 7972459961
श्रीम.अनुराधा गणेश बिराजदार
प्रा.आ.केंद्र उंबर्डे ता.वैभववाडी जि.सिंधुदुर्ग
- [email protected]
- 7972459961
श्रीम.अनुराधा गणेश बिराजदार
प्रा.आ.केंद्र वैभववाडी ता.वैभववाडी जि.सिंधुदुर्ग
- [email protected]
- 7972459961