पंचायत समिती,वैभववाडी
गतिमान प्रशासन

कोकणातल्या सिंधुदूर्ग जिल्हयाचे प्रवेशव्दार वैभववाडी.

वैभववाडी तालुका हा महाराष्ट्र राज्यातील सिंधुदूर्ग जिल्हयातील प्रवेशव्दार म्हणुन ओळखला जाणारा तालुका आहे. कोकण व पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा तालुका म्हणजे वैभववाडी महाराष्ट्र राष्ट्रीय महामार्ग क्र. 115 ने कोकण व पश्चिम महाराष्ट्र जोडले गेलेले आहे. कोकणातील सौंदर्य , सहयाद्रीचा कणखरपणा यांचा मिलाफ म्हणजे वैभववाडी.
वैभववाडी तालुका हा ग्रामीण तालुका म्हणून ओळख असलेला तसेच पारंपारीक शेती व शेती पुरक व्यवसाय हेच येथील लोकांचे मुख्य उत्पन्नाचे स्त्रोत आहेत. औदयोगिकीकरणाचा या तालुक्याला स्पर्श नसल्याने निसर्गाचे निखळ सौंदर्य आजवर जपलेले आहे. वैभववाडी तालुक्याला धबधब्याचा तालुका अशी वेगळी ओळख असून नापणे, करुळ, शिराळे, आचिर्णे येथील धबधबे प्रसिध्द आहेत. वैभववाडी तालुक्यामध्ये कुर्ली, नाधवडे , आखवणे अशी तीन विशाल धरणेसमाविष्ठ आहेत. ऐनारी येथील प्राचीन गुहा, नाधवडे येथील उमाळा ही ठिकाणे पर्यटन स्थळे म्हणून प्रसिध्द आहेत.

श्री.जयप्रकाश अनंत परब

प्रशासक तथा
गट विकास अधिकारी (उच्‍च श्रेणी) वर्ग – १
पंचायत समिती वैभववाडी

पंचायत समिती, वैभववाडी गौरवास्पद कार्य

पंचायत समिती वैभववाडी अंतर्गत सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी कोव्हिड , लम्पी सारखा कठीण काळ असेल किंवा घरे नसलेले गोरगरीब लाभार्थी असतील किंवा दैनंदिन कामकाजातील दिलेले उददीष्ट असेल या सर्वांमध्येच नेहमीच उल्लेखनीय कामकाज केलेले आहे. त्याचीच उपरती पुढील प्रमाणे.

देशातील पहिला कोव्हिड मुक्त तालुका वैभववाडी

प्रधानमंत्री आवास योजना केंद्रस्तर प्रथमव राज्यस्तर व व्दितीय पुरस्कार

रमाई आवास योजना राज्यस्तर प्रथम क्रमांक

लम्पी आजारामध्ये उल्लेखनीय कार्य

बेटी बचाव बेटी पढाओ उल्लेखनीय कार्य

जनसुविधा 100 % कामे पूर्ण

शालेय विदयार्थी 100% पटनोंदणी व 100% उपस्थिती

कृषिविषयक लाभ व मार्गदर्शन यासाठी विशेष प्रयत्न

पंचायत समिती वैभववाडी मार्फत नागरिकांना आणि इतर भागधारकांना माहिती आणि सेवा उपलब्ध करून देणे हा पोर्टलमागील उद्देश आहे. कोणताही अभिप्राय खालील पत्त्यावर मेल केला जाऊ शकतो किंवा खालील तपशीलांवर आमच्याशी संपर्क साधा.

पंचायत समिती,वैभववाडी,
सिंधुदुर्ग, महाराष्ट्र पिन कोड :416810

श्री जयप्रकाश परब
गटविकास अधिकारी
९४२०२५७६५५

श्री शशिकांत भरसट
सहाय्यक गट विकास अधिकारी
९२७०७८७६४०

श्री राजाराम लांबोरे
सहाय्यक प्रशासनाधिकारी
९४२११०२५१८